व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे वनाज-गरवारे महाविद्यालय दरम्यानच्या मेट्रोची वेळ रात्री दोन तासांनी वाढविण्याचा निर्णय ‘महामेट्रो’ने घेतला आहे.
त्यामुळे प्रवासी सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत मेट्रोने प्रवास करू शकतील. मेट्रोची वेळ सध्या सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत आहे.
गणेशोत्सवामुळे बाहेरगावचे अनेक नागरिक शहरात येत आहेत. कुतूहल म्हणून ते मेट्रोमधून प्रवास करीत आहेत. हे लक्षात घेऊन मेट्रोच्या वेळेत दोन तासांनी वाढ करण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे. हा बदल ९ सप्टेंबरपर्यंत असेल. या काळात दर ३० मिनिटांनी प्रवाशांना मेट्रो उपलब्ध होईल. पिंपरी चिंचवड-फुगेवाडी दरम्यानच्या मेट्रो मार्गाच्या वेळेत कोणताही बदल केलेला नाही, अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी दिली.
Discussion about this post