व्हीएसआरएस मराठी न्युज-भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
कुदळवाडी मनपा शाळेत शिक्षक दिन साजरा स्वी सदस्य दिनेश यादव यांचा पुढाकारनी शिक्षक दिनानिमित्त कुदळवाडी मनपा शाळा क्रमांक 89 येथील शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
शिक्षणाच्या माध्यमातून उद्याचा समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत घडविणाऱ्या सर्व शिक्षकांना वंदन व शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा यावेळी दिल्या !
ज्ञानातून माणसाची सर्वाधिक प्रगती होत असते. ज्याप्रमाणे एखाद्या मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देतो, त्याचप्रमाणे प्रत्येक शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवत असतो.
विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे, पण त्यांना समृद्ध करण्यात शिक्षकांचा वाटा अत्यंत मोलाचा ठरतो.
म्हणूनच भारतीय संस्कृतीने गुरुर्ब्रम्हा, गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरा असे म्हटले आहे. शिक्षकांप्रती आयुष्यभर कृतज्ञ राहिले पाहिजे, असे मला नेहमी वाटते.
तसेच यावर्षी शाळेला आदर्श शाळा पुरस्कार मिळाला आहे त्यामुळे शिक्षक दिनाला एक वेगळा आनंद झाला आहे.
यावेळी प्रभारी मुख्याध्यापक श्री संपत पोटघन उपस्थित होते.
श्री. मारूती खामकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी उपस्थित श्री रामकृष्ण लांडगे,कुंडलीक मोरे,विजय तापकीर,शरद गोरे, प्रकाश चौधरी,यश जाधव,करण पाखरे, स्वराज पिंजण, स्वप्निल पोटघन हे उपस्थित होते.
काल शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा खरा शिक्षक दिन नेमका कोणता डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिन की महात्मा फुले यांचा स्मृतिदिन ? हा प्रश्न उपस्थित होत असल्याने शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थीही संभ्रमात पडले आहेत. काल दिवसभर या विषयी सोशल मीडियात जोरदार वादविवाद दिसून आला. मात्र अनेकांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे व्हाट्सअप व फेसबुक व इतर सोशल मीडियावर स्टेट्स ठेवत त्यांच्या नावाला पसंती दिल्याचे चित्र होते.
महात्मा जोतिबा फुलेंचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. शाळेत शिकत असताना त्यांनी पाच-सहा वर्षातच अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांची बुद्धी अतिशय तल्लख होती त्यामुळे ग्रामची या प्रसिद्ध तत्ववेत्त्याने महात्मा फुले यांना ‘सेंद्रीय बुद्धीवंत’ असे संबोधले आहे. तर राधाकृष्णन यांचा जन्म ०५ सप्टेंबर १८८८ साली झाला.
महात्मा फुलेंनी राधाकृष्णन यांच्या जन्माच्या ४० वर्षांपूर्वी म्हणजेच १ जानेवारी १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा सुरू केली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. तर मग शिक्षकदिन राधाकृष्णन यांच्या नावाने साजरा कसा होतो ? हा प्रश्न पुरोगामी विचारांच्या विविध संघटनांनी सोशल मीडियावर केला आहे.
Discussion about this post