व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्यासह तीन अधिकारी उद्या रविवार (दि. 15) रोजी दुबईवारीसाठी रवाना होणार आहेत. त्यांचा हा दौरा शुक्रवार (दि. 20) पर्यंत असणार आहे.
या दौऱ्यामध्ये दुबईमध्ये विकसित करण्यात आलेल्या सिटी सेंटरच्या मॉडेलचा अभ्यास करण्यात येणार आहे. मात्र, या दौऱ्याबाबत प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.
महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. आयुक्त शेखर सिंह हेच प्रशासक म्हणून कारभार पाहत आहेत. त्यामुळे दुबई दौऱ्यामुळे आयुक्त रविवार (दि.15) ते शुक्रवार (दि.20) पर्यंत असे सहा दिवस शहरात नसणार आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त आयुक्त-1 प्रदीप जांभळे यांच्याकडे कारभार सोपविण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र रात्री उशीरापर्यंत त्याबाबतचे आदेश काढण्यात आले नव्हते.
Discussion about this post