व्हीएसआरएस मराठी न्युज –शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक काल संध्याकाळी 7 पासून ते 9.45 पर्यंत कफ परेड येथील ताज रेसिडंट या हाॅटेलमध्ये झाली.
शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर ही पक्षाची पहिली राष्ट्रीय कार्यकारिणीची पार पडली.
या कार्यकारिणीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षाच्या मुख्य नेते पदी निवड करण्यात आली.
सिद्धेश रामदास कदम हे शिवसेनेचे सचिव असतील.
दरम्यान, आमचा उल्लेख आता शिंदे गट नाही तर शिवसेना म्हणून करा, अशी मागणी शिंदे गटाकडून माध्यमांना करण्यात आली आहे. शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांनी माध्यमांना हे पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार यापुढे वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्रात वृत्तांकन करताना शिंदे गट असे न लिहिता ‘शिवसेना’ असे संबोधावे असे म्हटले आहे.
शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांनी प्रसिद्धीपत्रक पाठवले आहे. या पत्रात त्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार यापुढे वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्रात वृत्तांकन करताना शिंदे गट असे न लिहिता ‘शिवसेना’ असे संबोधावे असे म्हटले आहे.
Discussion about this post