व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –राज्य सरकारने पालिकेच्या नोकर भरतीवरील निर्बंध उठविले आहेत. त्यानंतर प्रशासनाने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली. रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिकेने सरळ सेवेने भरती प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेमध्ये 16 पदांच्या 386 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याकरिता सोमवार (दि. 19) पर्यंत मुदत होती. त्या मुदतीमध्ये एकूण 1 लाख 30 हजार 470 अर्ज आले आहेत. त्यापैकी 84 हजार 847 उमेदवारांनी एक हजार रुपये परीक्षा शुल्क भरले आहे.
तर 45 हजार 623 उमेदवारांनी अद्याप परीक्षा शुल्क भरले नाही. त्यांना त्यासाठी सोमवार (दि. 26) पर्यंत मुदत देण्यात येणार आहे.
लिपिक 213 पदासाठी 51 हजार 161, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 75 पदासाठी 43 हजार 412, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 41 पदासाठी 17 हजार 285, कनिष्ठ अभियंता (विद्युत) 18 पदासाठी 6 हजार 951, आरोग्य निरीक्षक 13 पदासाठी 3 हजार 500, अतिरिक्त कायदा सल्लागार 1 पदासाठी 165, विधी अधिकारी 1 पदासाठी 279, उपमुख्य अग्निशमन अधिकारी 1 पदासाठी 135, उद्यान निरीक्षक 4 पदासाठी 623, हॉट्रिकल्चर सुपरवायझर 8 पदासाठी 868, कोर्ट लिपिक 2 पदासाठी 461, अॅनिमल किपर 2 पदासाठी 267 आणि समाजसेवक 3 पदासाठी 2 हजार 629 अर्ज आले आहेत.
महापालिकेतील विविध विभागांतील ब आणि क गटातील 16 पदांच्या 386 जागांसाठीच्या सरळसेवा भरतीसाठी ऑनलाइन माध्यमातून तब्बल 1 लाख 30 हजार 470 अर्ज पालिकेस प्राप्त झाले आहेत.
Discussion about this post