पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर परिसरात भरधाव कारने रिक्षाला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर, रिक्षाचालकासह पाच जण जखमी झाले. भानूदास दामू गोरे (वय ५८, रा. सोरतापवाडी, लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. अपघातात रिक्षाचालक दिनेश किसन शिर्के, सुनीता काळूराम जगताप, विष्णू राजाराम अंधारे, छाया विष्णू अंधारे, इंदू लक्ष्मण जगताप जखमी झाले आहेत.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरे यांचा मुलगा सुमीत (वय २५) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी परिसरात भरधाव मोटारीने सकाळी साडेअकराच्या सुमारास रिक्षाला धडक दिली. अपघातात रिक्षातील प्रवासी भानूदास गोरे, रिक्षाचालक दिनेश शिर्के, सुनीता जगताप, विष्णू शिर्के, त्यांची पत्नी छाया, इंदू जगताप जखमी झाले.
गंभीर जखमी झालेल्या गोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या मोटारचालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. अधिक तपास उपनिरीक्षक घोडके करत आहेत.
Discussion about this post