पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | आगीत फर्निचर जळून भस्मसात झाले. सोमवार पेठेतील १५ ऑगस्ट चौकातील फर्निचर दुकानाला दुपारी आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.१५ ऑगस्ट चौकात दुपारी तीनच्या सुमारास एका फर्निचर दुकानात आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
तासाभरानंतर आग आटोक्यात आली. आगीत लाकडी फर्निचर जळून भस्मसात झाले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.
Discussion about this post