व्हीएसआरएस मराठी न्युज -चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या तिरंगी लढतीतील अपक्ष वंचित बहुजनचे पुरस्कृत उमेदवार राहुल कलाटे यांनी ग्रामदैवत म्हातोबा आणि आईचे आशीर्वाद घेऊन आज मतदानाचा हक्क बजावला.
भाजपा महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी पिंपळे गुरव येथील मतदान केंद्रावर सकाळीच मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा नेते शंकर जगताप, मुलगी अश्विनी रेणुसे आणि कुटुंबीय उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पिंपळे सौदागर येथील पी.के. इंटरनॅशनल स्कूल या मतदान केंद्रावर त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मतदान केले. थेरगावातील संचेती प्राथिमक व माध्यमिक शाळेच्या मतदान केंद्रावर खासदार बारणे यांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. त्यांच्या पत्नी सरिता बारणे यांनीही आपले मतदान केले..
Discussion about this post