व्हीएसआरएस मराठी न्युज –मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष रमेश कदम (Ramesh Kadman) यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कर्ज योजनेतून आजीच्या नावे पदाचा गैरवापर करून कर्ज घेऊन अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी सोलापूर सदर बाजार पोलिस स्टेशनमध्ये रमेश कदम यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या अपहाराच्या प्रकरणात पोलिसांनी रमेश कदम यांना अटक केली होती. त्यानंतर सोलापूर कोर्टाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र, आज झालेल्या युक्तिवादानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
अपहाराच्या प्रकरणातील आरोपी रमेश कदम यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तीवादामुळे पोलिसांनी मागितलेली दोन दिवसांची पोलिस कस्टडी नाकारण्यात आली आहे. रमेश कदम यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून महामंडळाच्या निधीचा अपहार करण्याच्या गैरहेतूने आपली आजी बायमा गणपत कदम यांच्या नावाने दुग्ध व्यवसायाचे कर्ज घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
Discussion about this post