व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-काही वेळापूर्वीच राज्यातील कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत. आता बाहेर फिरताना मास्क घालणं किंवा न घालणं ऐच्छिक असणार आहे. अशातच आता मास्क तोंडावरून उतरला असला तरी डोक्यावरचा भार कमी झाल्याचं दिसत नाही.
पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना कामावर येताना हेल्मेट (Helmet) वापरावे यासाठी त्यांना सुचना करण्यात आल्या असल्याचे देशमुख यांनी म्हणाले होते. शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रबोधन झाल्यावर सर्वसामान्य लोकांचे प्रबोधन केले जाणार असे जिल्हाधिकाऱ्यांनी (Collector) सांगितले आहे.
शासकीय कर्मचारी, शाळा, कॉलेज, महानगरपालिका, महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या सर्वांना हेल्मेट बंधनकारक असणार आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत.
सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद काम करणाऱ्या दुचाकीचालक कर्मचार्यांना हेल्मेटचा वापर बंधनकारक करण्यात आलंय.
4 वर्षांवरील सर्वांना हेल्मेट सक्तीचे असणार आहे. त्यामुळे आता पुणेकर या निर्णयाला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मात्र, पुण्यात कोणत्याही प्रकारची हेल्मेट सक्ती नसणार आहे, असे पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. रस्ते अपघातामध्ये मृत्यू होणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण जास्त आहे. त्यात हेल्मेटअभावी डोक्याला गंभीर दुखापत होऊन दगावणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कार चालकांच्या तुलनेमध्ये दुचाकी वाहन चालकाला अपघातात मृत्यू येण्याचा धोका सातपट अधिक असतो. रस्ते अपघातात जीव गमावलेल्यांपैकी ६२ टक्के व्यक्तींचा डोक्यावर इजा झाल्याने मृत्यू झाला आहे. हेल्मेटसक्तीमुळे दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता ८० टक्के आहे. यामुळे हेल्मेट सक्तीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता पुण्यात हेल्मेट सक्ती असणार नाही.
Discussion about this post