व्हीएसआरएस मराठी न्युज -द काश्मीर फाइल्स’ ही सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ठार मारण्याच्या धमख्या येण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रायलायकडून अग्निहोत्री यांना Y श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.
बॉलिवूड चित्रपट ‘द काश्मीर फाईल्स’ रिलीज झाल्यापासून चर्चेत आणि वादात आहे. एकीकडे अनेकांना हा चित्रपट आवडत आहे, काही राज्यांनी तर चित्रपट करमुक्त केला आहे. पण, दुसरीकडे अनेकांनी या चित्रपटाबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. ‘द काश्मिर फाईल्स’ हा चित्रपट काश्मीर पंडितांवर 1990 साली झालेल्या अत्याचारांसंदर्भातील कथानकावर आधारित आहे. या चित्रपटावरून देशात समर्थनार्थ आणि विरोधात असे दोन गट पडले आहेत. याशिवाय विवेक यांना सतत धमकीचे फोन येत आहेत. येणा-या धमकीचे कॉल्स आणि मेसेजची संख्याही वाढत आहे. या मेसेज आणि कॉल्समधून जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत.
Discussion about this post