व्हीएसआरएस मराठी न्युज –मागच्या आठवड्यात अजित पवार अचानक नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर त्यांनी प्रकृतीचं कारण दिलं. आजही अजित पवारांनी त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे नी सांगितले
मुंबईत बैठकीसाठी निघाले आहे. पक्षाच्या बैठकीला सगळे आमदार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. बैठकीला निघण्यापूर्वी त्यांनी गोड बातमीची वाट पाहत असल्याचं सांगितलंय. राष्ट्रवादीचे हे आमदार कोणत्या गोड बातमीच्या प्रतीक्षेत आहेत असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित केला जात आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. ‘पक्षाने दिलेल्या आदेशानुसार आपण मुंबईकडे जात आहोत’, असे ते म्हणाले.
सध्याच्या घडामोडीवर त्यांनी भाष्य करण्याचा टाळलं मात्र लवकरच आनंदाची बातमी मिळणार असल्याचं सांगत आमदार बनसोडे यांनी सूचक विधान केल्याने नेमकं राष्ट्रवादीमध्ये काही तरी चाललंय हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
मी अजित पवारांसोबत आहे, ते घेतील तो निर्णय मान्य असल्याचं बनसोडे यांनी म्हटलं आहे.
Discussion about this post