व्हीएसआरएस मराठी न्युज –
महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी या संपाची हाक दिली आहे.
अदानी समुहाला वीज वितरणाचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या ३० संघटनांनी हा संप पुकारला आहे.
तीन दिवसीय राज्यव्यापी संपामुळे राज्यातील भागांत तांत्रिक बिघाड झाल्यास, मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात महावितरणचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी मंगळवारी (दि.०३) मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. महावितरण कर्मचाऱ्यांकडून तीन दिवसीय राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे.
महावितरणचे खासगीकरण करण्याच्या विरोधात ही संपाची हाक देण्यात आली आहे. गरज पडल्यास हा राज्यव्यापी संप तीन दिवसानंतरही सुरु ठेऊ अशी भूमिका माहावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या जवळपास ३० संघटनांनी हा संप पुकारला आहे. ४,५ व ६ जानेवारी २०२३ असा तीन दिवस हा संप असणार आहे.
वीज कंपन्यांचे खाजगीकरण करू नये या प्रमुख मागणीसाठी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांनी दोन दिवसांपूर्वी ठाणे येथे हजारोंच्या संख्येने आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारकडून कोणतीही कृती न झाल्यास संपाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे अखेर राज्यभरातील वीज वितरणचे कर्मचारी संपावर जात आहेत. आज मध्यरात्री पासून७२तासांचा हा संप केला जाणार असून यामध्ये राज्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती मधील सर्व कर्मचारी सहभागी होणार आहे.दरम्यान विद्युत पुरवठा काही कारणास्तव बंद झाल्यास नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जाण्याची शक्यताआहे.
Discussion about this post