व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरात आपल्या विकास कामांच्या जोरावर एक अनोखी छाप निर्माण करणारे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज दुःखद निधन झाले. तर लक्ष्मण जगताप यांच्यावर काढलेले भावनिक व्यंगचित्र सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आकस्मित झालेल्या निधना बाबत व्यंगचित्रकार गणेश भालेराव यांनी व्यंगचित्र काढत त्यांच्या भावनांना वाट करून दिली आहे. त्यांनी काढलेल्या व्यंगचित्रांमध्ये लक्ष्मण जगताप हे अनंताच्या प्रवासाला निघाल्याचे दिसत असून पिंपरी चिंचवडकर धाय मोकलून रडताना दिसत आहे. अशा प्रकारे अत्यंत भावनिक व्यंगचित्र रेखाटत जगताप यांना श्रध्दांजली वाहीली आहे. लक्ष्मण जगताप हे वारकरी सांप्रदायाचा वारसा जपणारे अत्यंत मनमिळावू व्यक्तिमत्व होते.
दरवर्षी त्यांचा पालखीमध्ये सहभाग असायचा.वारकर्यांना ते विवीध माध्यमातून सहाय्य तसेच किर्तन सोहळ्याचे आयोजन ते करीत असत. पिंपरी चिंचवड शहरात अनेक विकासकामांसाठी त्यांनी महत्वपुर्ण पाठपुरावा केला होता. तर अनेक प्रश्नां संदर्भात त्यांनी लक्षवेधी मांडत अनेक कामे तडीस नेली होती. जगताप यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Discussion about this post