पोटनिवडणुकीतील कमकुवत व जमेच्या ठरलेल्या बाबींवर होणार चिंतन ?
आभार मेळाव्यामुळे कार्यकर्त्यांना बळ
आगामी मनपा निवडणुकीची ठरणार रणनीती
पिंपरी | (व्हीएसआरएस न्यूज) |
पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)राष्ट्रवादी काँगेस पार्टी च्या वतीने आज सायंकाळी ( दि.९) थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालयात महाविकास आघाडीतील सर्व आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, सेल अध्यक्ष, कार्यकारणी, प्रभाग-वार्ड अध्यक्ष, सर्व केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आभार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार व चिंचवड विधानसभा निरीक्षक सुनील शेळके ,
शहराध्यक्ष अजित गव्हाणे, सचिन भोसले,डॉ. कैलास कदम आणि मनपाचे माजी विरोधी पक्षनेते, मा.नगरसेवक आणि पोटनिवडणुकीतील उमेदवार
विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्यासह शहरातील जेष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या आभार मेळावा पार पडणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या चिंचवड विधानसभा व कसबा विधानसभा पोटनिवडणुकीने राज्याचे लक्ष वेधून घेतले. या निवडणुकीत कसब्यातुन महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर (काँगेस) तर चिंचवडमधून महायुतीच्या अश्विनी जगताप (भाजप) यांची आमदारपदी निवड झाली.
दरम्यान चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत झालेल्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना दुसऱ्या क्रमांकाची ९९ हजार ४३५ इतकी मते मिळाली. या निवडणुकीत नानांना मिळालेली मते लक्षणीय ठरली आहेत.
आजचा आभार मेळावा ठरणार लक्षवेधी !
एकजूटीने पोटनिवडणुकीला सामोरे गेलेल्या महाविकास आघाडीला या निवडणुकीत अपयश आले असले तरी मिळालेली लाखभर मते ही कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविणारी आहेत. निवडणूकीतील जमेच्या व कमकुवत ठरलेल्या बाजू कोणत्या यावरही या मेळाव्यात विचार मंथन होईल असा अंदाज वर्तविला जात आहे. शहर पदाधिकाऱ्यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान पवार यांनी पुढील निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे आगामी महानगरपालिका तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठीची कोणती रणनीती या आभार मेळाव्यात ठरणार आहे हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. महाविकास आघाडीसाठी सध्याची राजकीय परिस्थिती अद्यापही अनुकूल आहे.या मेळाव्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना व कार्यकर्त्यांना नक्कीच बळ मिळणार आहे.
Discussion about this post