कै. भीमराव जवळकर विकास संस्थेतर्फे स्पर्धेचे आयोजन
पिंपरी | (व्हीएसआरएस न्यूज) | जागतिक महिला दिनानिमित्त कासारवाडी येथील कै. भीमराव जवळकर विकास संस्थेच्या वतीने महिला बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेस विविध ठिकाणच्या महिला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून महेशदादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशनने महिला चषक २०२३ चा किताब पटकाविला.
या स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या मंजिरी मदन कोठुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ कासारवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा रघुनाथ जवळकर, उद्योजक रघुनाथ जवळकर ,डॉ .मदन कोठुळे राष्ट्रीय पंच मुष्टीयुद्ध सचिन शिंगोटे, किरण सूर्यवंशी , संगीता मस्के, पूजा डीसिल्वा, स्मिता सालपेकर, आरती सोनवणे आदी मान्यवर व महिला खेळाडू व नागरीकांच्या उपस्थित पार पडला.
स्पर्धेत पंच म्हणून देवेंद्र सिंग यादव ,सदानंद साबळे, विश्वजीत कांबळे, अमोल निचळ यांनी काम पाहिले.
स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू :
अन्वेषा शिंदे ,कन्हैया कलशेट्टी, तनुष्का कलशेट्टी, ऋतुजा सोनकांबळे, पलक ओसवाल, श्रद्धा प्रसाद ,वैष्णवी शिंगोटे,
साक्षी कराळे, कल्याणी खोंडगे, अनुष्का साठे, मयुरी साठे, अस्मिता साठे’ ऐश्वर्या साठे प्रणाली शिंदे आदी
रौप्य पदक विजेते खेळाडू
स्नेहल कांबळे, ज्ञानेश्वरी साळुंखे, अवनी हांडे, तनवी गव्हाणे, चैत्राली लांडगे
Discussion about this post