व्हीएसआरएस मराठी न्युज –
महाराष्ट्रातील सकल मराठा समाज आणि मुंबईतील मराठा क्रांती महामोर्चाने मंगळवार, 5 सप्टेंबर 2023 पासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाची घोषणा केली आहे,” असे अमोल जाधवराव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जालना आंदोलनाबाबत सरकारच्या चुकीच्या कारभाराचा दाखला देत आंदोलक गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
या आंदोलनाचे नेतृत्व अमोल जाधवराव, संजय घार्गे, विपुल माने, बाबा गुंजाळ, युवराज सूर्यवंशी, महेश राणे, धनंजय शिंदे, विलास सुद्रिक, कोंडिबा शिंदे, अविनाश पवार, बन्सी डोके, संतोष पालांडे, आझादमन येथील स्वयंसेवक करणार आहेत.
Discussion about this post