व्हीएसआरएस मराठी न्युज –भाजप , एकनाथ शिंदे गट मिळून मिशन 45 करणार – भारतीय जनता पक्षाचे मिशन 45 हे केवळ भाजपचे नाही तर शिवसेना शिंदे गट मिळून मिशन 45 पूर्ण करतील. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय मंत्र्यांकडून काही लोकसभा मतदारसंघात लक्ष घातलं जात असले तरी, या मतदारसंघातून एकत्रित रित्या निवडणूक लढवली जाईल असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या मिशन 45 वर दिलं आहे.
लोकसभा मतदारसंघापूर्वी मिशन 45 साठी ठाकरे गटाच्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या खासदारांच्या मतदारसंघात भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. तर तेथेच एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांच्या मतदारसंघातही केंद्रीय मंत्र्यांची दौरे आखण्यात आले आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघ- सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी
बुलढाणा लोकसभा मतदारसंघ- प्रतापराव जाधव, एकनाथ शिंदे गट
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ- बाळू धानोरकर, काँग्रेस
हिंगोली मतदारसंघ- हेमंत पाटील, शिंदे गट
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ- इम्तियाज जलील, एम आय एम
पालघर लोकसभा मतदारसंघ- राजेंद्र गावित एकनाथ -शिंदे गट
कल्याण लोकसभा मतदारसंघ- श्रीकांत शिंदे , एकनाथ शिंदे गट
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ- राहुल शेवाळे, एकनाथ शिंदे गट
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ- अरविंद सावंत, शिवसेना
रायगड लोकसभा मतदारसंघ- सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस
शिरूर लोकसभा मतदारसंघ -अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस
सातारा लोकसभा मतदारसंघ- श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ- विनायक राऊत, शिवसेना
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ- संजय मंडलिक, एकनाथ शिंदे गट
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ- धैर्यशील माने, एकनाथ शिंदे गट
या लोकसभा मतदार संघावर भाजपने आपले लक्ष केंद्रित केले आहे. सध्या कल्याण लोकसभा मतदार संघातून भाजपने केंद्रीय नेतेमंडळी पाठवायला सुरूवात केली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर सध्या या मतदार संघात आढावा घेत आहेत. लवकरच राज्यातील इतर लोकसभा मतदार संघात देखील केंद्रीय नेते मंडळी आढावा घेणार आहेत.
Discussion about this post