व्हीएसआरएस मराठी न्युज कुदळवाडी-कुदळवाडी परिसरातील अनेक रस्ते आणि चौकांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या भागातील ठिकठिकाणी रस्ते उखडले असून, तयार झालेल्या खड्ड्यांनी वाहने खिळखिळी करून टाकली आहेत.
दैनंदिन कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिक आणि विद्यार्थी यामुळे मेटाकुटीला आले आहेत.
हे खड्डे, साचलेले पाणी यामुळे वाहनांचा वेग कमी होऊन ठिकठिकाणी वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत आहे.
यामधून महापालिकेने नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
Discussion about this post