व्हीएसआरएस मराठी न्युज चिंचवड –
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड मतदार संघाची भाजपाची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याने भाजपकडून आता त्याच उमेदवार असणार का ?
याबाबत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होतीच. दरम्यान लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांचे लहान बंधू शंकर जगताप या दोघांची नावं चर्चेत होती. अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याने भाजपकडून आता त्याच उमेदवार असणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर करण्याआधीच माजी नगरसेवक नाना काटे यांनी नामनिर्देश पत्र विकत घेतलं आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी अद्याप चिंचवड विधानसभेतील इच्छुकांच्या मुलाखती घेतलेल्या नाहीत.
त्या होण्याआधीच राष्ट्रवादीकडून नाना काटे यांनी अर्ज विकत घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 2014 मध्येही काटे यांनी चिंचवड विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 42 हजार 553 मतं पडली होती. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसने पोटनिवडणुकीबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट करण्याआधीच माजी नगरसेवक नाना काटे अर्ज विकत घेतला आहे.
Discussion about this post