पिंपरी | (व्हीएसआरएस न्यूज) | चिंचवड पोटनिवणुकीसाठी भाजप कडून अजून अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नसताना दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि बंधू शंकर जगताप यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही इच्छुक उमेदवार असलेल्या नाना काटे यांनीही उमेदवारी अर्ज घेतला असून राहुल कलाटे यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतला आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी २०२३ रोजी निधन झले. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसातच चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यानुसार ३१ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज घेण्यास सुरुवात झाली आहे. प्रमुख पक्ष असलेले भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावतीने अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही.
दरम्यान भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप व बंधू शंकर जगताप यांची नावे चर्चेत आहेत. तर राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या फार मोठी असून गेल्या निवडणुकीत १ लाखाहून अधिक मते घेतलेल्या राहुल कलाटे यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे उमेदवारी जाहिर होण्यापूर्वीच आज अश्विनी जगताप, राहुल कलाटे, नाना काटे आणि शंकर जगताप यांनी उमेदवारी अर्ज नेले असल्यामुळे राजकीय वर्तुळात लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
Discussion about this post