नवी दिल्ली : आगामी लोकसभा आणि काही विधानसभांच्या निवडणुकीचा कार्यक्रम उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी उद्या १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेण्याचे ठरविले असून तशी घोषणा आयोगाच्या प्रवक्त्याने ट्विटर एक्स या सोशलमीडिया प्लॅटफॉर्मवर केली आहे.
निवडणूक जाहीर होताच देशभरात आचारसंहिता लागू होणार असून या निवडणुका सुमारे ७ टप्प्यात होण्याची शक्यता आहे.मागील वेळी निवडणुका ७ टप्प्यात झाल्या होत्या. ६७.१ टक्के मतदान झाले होते. यावेळी सुमारे ९७ कोटी मतदार उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत.
Discussion about this post