व्हीएसआरएस मराठी न्युज निगडी-निगडी उड्डाणपुलापासून महापालिकेचे ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय काही अंतरवर आहे. तरी देखील एकाही अधिकाऱ्यांनी कारवाई केली नसल्याचे दिसून येत आहे. उलट, क्षेत्रीय कार्यालयांनी हद्दीवरून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे.
संरक्षक भिंतींची तोडफोड…..
महापालिकेने उड्डाणपुलाखाली बांधलेल्या संरक्षक भिंती सर्रासपणे तोडल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. संरक्षक भिंती तोडून तेथून मार्ग तयार केला आहे. त्यामुळे निगडीतील कै.मधुकर पवळे उड्डाणपूल कुणाची खासगी मालमत्ता आहे का? असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.
पवळे उड्डाणपुलाच्या सुशोभीकरणासाठी वर्षभरापूर्वी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. या माध्यमातून पालखीतील वारकऱ्यांची विविध रूपे पुलाखाली रेखाटण्यात आलेली आहेत. यातून निगडीच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. यासाठी महापालिकेला तब्बल एक कोटी रुपयांच्या आसपास खर्च आला आहे. परंतु अलीकडेच काही व्यावसायिकांनी या पुलाखाली अतिक्रमण करत त्या ठिकाणी खाद्य पदार्थांचे गाड्या थाटल्या आहेत. तर काहींनी त्या ठिकाणी टपऱ्या टाकून भाड्याने देण्याचा प्रकार सुरू आहे. या टपरीधारक सिलिंडर वापरतात, एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अनेक जण रस्ता ओंलाडून खरेदीसाठी जात असल्याने अपघात संभवतो. दरम्यान, निगडी उड्डाणपुलाखाली ‘खाऊ गल्लीच’ उभारायची होती तर मग सुशोभीकरणासाठी महापालिकेने खर्च का केला असावा? असा प्रश्न सर्वसामान्य निगडीकरांच्या मनात उपस्थित होत आहे.
मधुकर पवळे उड्डाणपूल खाली बी आर टी बस स्टॉप पाठीमागे हातगाडी धारक व टपरीधारक ह्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी पात्र टपरीधारक १९ जण असताना त्या ठिकाणी ३४ टपरीधारक ह्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे विशेषतः परवाना नसताना सुद्धा कसं घुसखोरी करून त्या ठिकाणी हातगाडी धारक ह्यांना जागा देण्यात आली?
रिक्षा संघटनांनी १३/९/२०२२ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त ह्यांना मधुकर पवळे उड्डाणपूल खाली पार्किंग सुविधा बंद करून त्या ठिकाणी हातगाडी धारक व टपरीधारक ह्यांनी अतिक्रमण केले म्हणून लेखी पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे.
अविनाश साळवे, राजू शेख ,समाधान मगर , प्रबुद्ध कांबळे, फयाज शेख यांनी पत्रक देऊन कार्यवाही करणेच मागणी केली आहे.
Discussion about this post