व्हीएसआरएस मराठी न्युज निगडी-मोकाट कुत्रे व भटकी जनावरे रस्त्यावर सैरावैरा धावत असल्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत. ती थेट वाहनांच्या समोर येत असल्याने अपघाताचे प्रसंग ओढवत आहेत.
महापालिका, शहरातील सामाजिक संस्था, श्वानप्रेमी आणि पशुवैद्यकीय विभागाने मात्र यावर कंबर कसणे गरजेचे आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या मोकाट कुत्र्यांमुळे व जनावरांमुळे वाहतूक कोंडी होत असून, छोटे-मोठे अपघात घडत आहेत. तसेच, जनावरे नागरिकांच्या दिशेने अंगावर जात असल्याचे दिसत आहे.
Discussion about this post