व्हीएसआरएस मराठी न्युज –कुख्यात गँगस्टर अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची मीडियाशी बोलताना हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडल्यानंतर उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात खळबळ माजली आहे.
उत्तर प्रदेशातील माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ या दोघांचा आज, शनिवारी गोळीबारात मृत्यू झालाय. अतिक आणि अश्रफला पोलिस वैद्यकीय तपासणीसाठी नेत असतानाच पत्रकार बनून आलेल्या हल्लेखोरांनी त्याची हत्या केली.
उमेश पाल हत्या प्रकरणी फरार असलेला अतिकचा मुलगा असद याचा दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. आजच कुटुंबियांकडून त्याचा मृतदेह दफन करण्यात आला त्यानंतर लगेचच अतिक आणि अश्रफची हत्या झालीय. बसपा आमदार राजू पाल यांच्या हत्या प्रकरणात अतिक अहमद आरोपी होता. तेव्हापासून तो फरार होता. पण नंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वी अतिकला गुजराच्या साबरमती तुरुंगातून त्याला नुकतेच प्रयागराज तुरुंगात हालवण्यात आले होते. दरम्यान मेडीकल टेस्टसाठी नेत असताना हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ मारल्या गेले आहेत.
Discussion about this post