व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड परिसरातील कस्तुरी मार्केट, चिंचवड स्थित अंध, अपंग विकास असोसिएशनच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड (शहर) उपाध्यक्ष आयु.अलोक प्रदीप गायकवाड होते. कालकथित प्रदीप बाळासाहेब गायकवाड यांच्या सामाजिक कार्याने प्रेरित होऊन आणि संस्थापक कालकथित दिनकर रामचंद्र गायकवाड यांच्या निधनानंतर संस्थेचे कार्य पार पाडत असल्याचे सांगितले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागाचे लिपिक आयु. स्वप्निल बाबा भालेराव यांनी उपस्थित दिव्यांग बंधू भगिनी यांना भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची तसेच त्यांनी समाजातील सर्व घटकांना उपलब्ध करून दिलेले हक्क यांची माहिती दिली. यावेळी उद्योजक चंद्रकांत सहाणे, सामाजिक कार्यकर्ते चिंतामणी कुलकर्णी हे उपस्थित होते तर सामाजिक कार्यकर्ते बी. आर. माडगूळकर यांनी दिव्यांगांना फळे वाटप केली.
Discussion about this post