व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ आता राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली आहे. राज्यभर राष्ट्रवादीकडून निदर्शनं करण्यात येत आहेत. मुंबईतही राष्ट्रवादीचं आंदोलन सुरुये. मुंबईतील गांधी पुतळ्याजवळ मंत्रालयाशेजारी महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे बडे नेते या आंदोलनात सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत.
या आंदोलनात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार , महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, रुपाली चकणकर, बाळासाहेब पाटील, अदिती तटकरे, निलोफर मलिक इत्यादी सर्व नेते सहभागी झाले आहेत.
भाजपकडून मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी मलिकांच्या मागे ठामपणे उभी असल्याचं चित्र आहे.
नवाब मलिक यांची जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना सेशन कोर्टात हजर करण्यात आलं. 54 नंबरच्या कोर्टात नवाब मलिक यांना हजर करण्यात आलं. ईडीकडून (ED) अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तीवाद केला. ईडीने नवाब मलिक यांच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. सेशन कोर्टात तब्बल अडीच तास दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद झाला. यानंतर सेशन कोर्टाने नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
नवाब मलिक यांच्यातर्फे ज्येष्ठ वकिल अॅड. अमित देसाई यांनी युक्तीवाद केला. ही घटना २००३ पूर्वीची आहे. तेव्हा PMLA कायदा अस्तित्वात नव्हता, तेव्हा कारावाई का करण्यात आली नाही असा मुद्दा अॅड. अमित देसाई यांनी उपस्थित केला. अचानक 20 वर्षांनी अटक करुन तपास यंत्रणा १४ दिवसांची कोठडी कशी मागू शकत, असा युक्तीवाद अॅड. अमित देसाई यांनी केला.
Discussion about this post