व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -लोकमान्य हॉस्पिटल निगडी ते श्री म्हाळसाकांत चौक या रस्त्यावर पावसाळी पाणी वाहून नेणारी मोठी भूमिगत लाईन आहे या लाईनवर ठीक ठिकाणी चौकोनी चेंबर वर लोखंडाच्या जाळ्या बसवल्या आहेत .
त्या रस्त्यावरील चेंबरच्या लोखंडाच्या जाळ्या दुरुस्त कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवडचे सरचिटणीस इखलास सय्यद यांनी अ क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या या या चेंबरच्या काही जाळ्या ठीक ठिकाणी तुटल्या असुन अपघाताची शक्यता आहे खास करून दुचाकी वाहनांना याचा फार धोका आहे तरी या ठिकणी दुरुस्तीचे काम त्वरित हाती घ्यावे,असे ही निवेदनात म्हटले आहे.
Discussion about this post