व्हीएसआरएस मराठी न्युज –आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात आज ‘अ’ गटातील दोन संघ आज आमने-सामने असणार आहेत. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानने भारतीय संघासमोर १४८ धावांचे आव्हान दिले आहे. मोहम्मद रिझवानने ४२ चेंडूमध्ये ४३ खेळीच्या जोरावर पाकिस्तानने धावांपर्यंत मजल मारली. मोहम्मद रिझवानशिवाय इफ्तिखार अहमदने २२ चेंडूमध्ये २८ धावांची खेळी केली. भारताकडून भुवनेश्वर कुमारने ४, हार्दिक पंड्याने ३ तर अर्शदिप सिंह २ विकेट्स पटकावल्या. भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्याच्या अचूक माऱ्यासमोर पाकिस्तानचा संघ ढेपाळला.
Discussion about this post