व्हीएसआरएस मराठी न्युज -दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांच्या मालकीचं हे घर असून त्यांच्या आयुष्यातील अखेरचे दिवस या निवासस्थानी घालवले होते.
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचे जुलै 2019 मध्ये निधन झालं होतं. त्यावेळी राहुल गांधी यांनी त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली होती. शिला दीक्षित त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये या घरी राहत होत्या. हे घर थ्री बीएचके असून एकूण 1500 स्क्वेअर फूट असल्याची माहिती आहे.
शिला दीक्षित या दिल्लीच्या तीन वेळा मुख्यमंत्री राहिल्या होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र आणि दिल्लीचे माजी खासदार संदीप दीक्षित हे या घरात राहत होते. आता राहुल गांधी या घरी राहायला येणार असल्याने संदीप दीक्षित यांनी हे घर रिकामं केल्याची माहिती आहे. राहुल गांधी या ठिकाणी भाड्याने राहणार आहेत.
Discussion about this post