व्हीएसआरएस मराठी न्युज -90 च्या दशकांतील टीव्ही मालिकांमध्ये छोट्या भूमिका करुन राजु श्रीवास्तवची मोठी झलक इंडियन लाफ्टर चँलेजमध्ये दिसली होती. या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. पहिल्या लाफ्टर चँलेजचे विजेतेपद हे सुनील पालनं मिळवलं होतं. मात्र त्यात सगळ्यात लक्षवेधी ठरला तो राजु श्रीवास्तव. राजुनं त्या मालिकेतून अमाप लोकप्रियता मिळवली. घराघरात त्याचे नाव झाले. तो प्रेक्षकांच्या आवडीचा सेलिब्रेटी झाला होता. आता मात्र त्याच्या अचानक चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. राजुनं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम केले. त्यानं मालिका. चित्रपट, जाहिराती यामध्ये काम केले. याशिवाय काही हिंदी विनोदी नाटकांमध्ये देखील त्यानं केलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी पसंत केले होते.
राजू जवळपास ४० दिवसांपासून दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. ट्रेडमिलवर धावता धावता राजू खाली कोसळले. त्याला हदयविकाराचा झटका आल्याचे सुत्रांनी सांगितले होते. डॉक्टरांच्या पथकाने त्यांचा वैद्यकीय इतिहास तपासल्यानंतर अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तो क्लिनिकल उपचारांना प्रतिसाद देत असल्याचेही सांगण्यात आले होते.
Discussion about this post