व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बुधवारी (२१ सप्टेंबर) पुण्यात येणार आहेत.
मिशन बारामती मोहिमेला प्रत्यक्ष गुरुवारपासून प्रारंभ होणार आहे. अमेठी मतदारसंघ जिंकला, आता बारामतीही जिंकणार, असा विश्वास या दौऱ्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दोन वर्षांनंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी भारतीय जनता पक्षाने सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बारामती दौरा प्रस्तावित आहे. या दौऱ्यावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात शाब्दिक लढाई सुरू झाली आहे.
निर्मला सीतारामन यांचा हा तीन दिवसांचा दौरा असून दौरा यशस्वी करण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.
मिशन लोकसभेसाठी भाजपने १४४ जागा निश्चित केल्या आहेत. त्यातील सोळा जागा राज्यातील असून यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह यांनी काही दिवसांपूर्वी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला होता.
Discussion about this post