पिंपरी चिंचवड | (व्हीएसआरएस न्यूज) | मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सव देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला असून त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरातील वडमुखवाडी येथील प्रसिद्ध साई बाबा मंदिर मध्ये रामनवमी निमित्त पहाटे पासूनच साई मंदिर व राम मंदिरामध्ये अभिषेक महापुजा आरती व रामजन्म उत्सव मोठ्या उत्साह मध्ये संपन्न झाला.
साई बाबा मंदिरात व राम मंदिरात सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी दर्शना साठी साई मंदिर व राम मंदिरामध्ये गर्दी केली होती हजारों भावी भक्तांनी राम लल्ला चे दर्शन केले त्याचबरोबर मंदिराचे संस्थापक अध्यक्ष सुभाष निलगे व विश्वस्त शिवकुमार निलगे यांनी येणाऱ्या हजारो भाविकांच्या दर्शनाची व महाप्रसादाची सुंदर अशी व्यवस्था ही साईबाबा मंदिराच्या वतीने करण्यात आली होतीआणि सर्व भाविकांचे दर्शनाची व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
Discussion about this post