व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी – आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या सुनेने (१० जुलै) संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे आळंदी परिसरात एकच खळबळ उडाली होती.
लग्नातील उर्वरित फर्निचर व इतर वस्तुसाठी नवरा, सासु व सासरे प्रियंकाला मानसिक व शारीरिक छळ करत असल्यानेच ही घटना घडली असून त्यांच्याविरोधात आळंदी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपींना अटक करून त्यांची रवानगी सध्या येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. आरोपी कुटुंब वारंवार न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज करत असताना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मे. खेड न्यायालयाने त्यांना पुन्हा आज जोरदार चपराक देत त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे. यावेळी न्याय मिळण्याचा अपेक्षेने न्यायालयात आवर्जुन प्रियांकाचे वडील बापु घोलप व आई माजी नगरसेविका कमल बापु घोलप उपस्थित होते.
Discussion about this post