व्हीएसआरएस मराठी न्युज -भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट बैठकीत मुख्तार अब्बास नक्वी यांचे कौतुक केले.
देशाच्या विकासात नक्वी यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले. नक्वी यांचा उद्या राज्यसभा खासदार म्हणून शेवटचा दिवस आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीनंतर नक्वी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली असणारचं. मात्र याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. दुसरीकडे मात्र, नक्वी यांच्या भविष्यातील भूमिकेबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.
Discussion about this post