व्हीएसआरएस मराठी न्युज -भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचे कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्या 91 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली असा परिवार आहे. आज सांयकाळी साडेआठ वाजता कोल्हापूर येथील पंचगंगा स्मशानभूमी येथे सरस्वती पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Discussion about this post