व्हीएसआरएस मराठी न्युज निगडी-निगडी परिसरातील रस्त्यावर ट्रॕव्हलबस वाहनांची पार्किंग केली जात असल्यामुळे वाहतुकीस अडथळा
होत आहे.
पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर निगडी येथील टिळक चौक परिसरात खासगी ट्रॅव्हल्स बस उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी समस्येमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. निगडी येथे बी जी क्रार्नर बिल्डिंग मध्ये पिंपरी चिंचवड नामवंत डॉक्टर बसतात त्या मुळे पेशंटचा ये जा असतो. पण ट्रॕव्हल बस पार्गिंग मुळे वाहतूक अडथळा होतो.
त्या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही वाहतूक पोलिस बेशिस्त बसचालकांवर कारवाई न करता त्यांना अभय देत असल्याचे चित्र आहे.
निगडी चौकात बस थांबा आहे. या चौकात वाहनांची मोठी वर्दळ असते. याच चौकात ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी प्रवाशांसाठी पिक अप पॉईट सुरू केला आहे. विशेषत: सायंकाळनंतर त्या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या संख्येने बस थांबतात. प्रवाशांनी बस भरेपर्यंत
त्या ठिकाणी बस उभी केली जाते. त्यामुळे सर्व्हिस रस्त्यांवरील वाहनांना रस्त्याच शिल्लक राहत नाही. परिणामी, वारंवार वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहनचालक संताप व्यक्त करीत आहेत.
या संदर्भात वाहतूक पोलिस व महापालिकेकडे वारंवार तक्रार करण्यात आली आहे. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे. ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी भर रस्त्यावर सुरू केलेला हा बेकायदेशीर पिक अॅप पॉईट बंद करून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
Discussion about this post