व्हीएसआरएस मराठी न्युज -भारतात आतापर्यंत दुसरा डोस घेतल्यानंतर 9 महिन्यांनी हा डोस दिला जात होता. पण आता दुसरा डोस आणि प्रिकॉशन डोसमधील गॅप कमी करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रिकॉशन डोससाठी अंतर आता 9 महिन्यांवरून 6 महिने केलं आहे.
म्हणजे कोरोना लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर आता 9 ऐवजी 6 महिन्यांनी तुम्हाला हा प्रिकॉशन डोस घेता येणार आहे. त्यामुळे तिसऱ्या डोससाठी 9 महिने लांबलचक प्रतीक्षा आता थोडी कमी झाली आहे.
केंद्र सरकारने 6 जुलैला दिलेल्या माहितीनुसार भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 198.20 (1,98,20,86,763) कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यापैकी 4,75,78,267 नागरिकांनी प्रिकॉशन डोस घेतला आहे. यात 18 ते 14 वयोगटातील 33,99,371, 45 ते 59 वयोगटातील 27,76,957, 60 पेक्षा जास्त वयाच्या 2,50,63,110 नागरिकांनी तिसरा डोस घेतला. तर 57,75,640 आरोग्य कर्मचारी आणि 1,05,63,189 फ्रंटलाइन वर्कर्सना हा डोस देण्यात आला आहे.
Discussion about this post