व्हीएसआरएस मराठी न्युज –आता ग्राहकांना त्यांनी खरेदी केलेलं औषध सुरक्षित आहे का आणि ते बनावट तर नाही ना? हे लवकरच तपासता येणार आहे. बनावट आणि निकृष्ट औषधांचा वापर रोखण्यासाठी आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी सर्वाधिक विक्री होणाऱ्या औषधांसाठी ‘ट्रॅक अँड ट्रेस’ प्रणाली सुरू करण्याची सरकारची योजना आहे.
या अंतर्गत, पहिल्या टप्प्यात फार्मास्युटिकल कंपन्या 300 सर्वाधिक विकल्या जाणार्या औषधांच्या प्राथमिक उत्पादन पॅकेजिंग लेबलवर बारकोड किंवा क्यूआर कोड प्रिंट किंवा चिटकवतील. यामध्ये प्रति स्ट्रिप १०० रुपयांपेक्षा जास्त एमआरपीसह मोठ्या प्रमाणात विकल्या जाणार्या अँटीबायोटिक्स, कार्डियाक, वेदना कमी करणार्या गोळ्या आणि अँटी-एलर्जिक औषधांचा समावेश असणं अपेक्षित आहे. याबाबतचा ठराव मात्र दशकभरापूर्वी घेण्यात आला होता. पण देशांतर्गत फार्मा उद्योगात आवश्यक तयारी नसल्यामुळे ते थांबवण्यात आलं.
निर्यातीसाठी ट्रॅक आणि ट्रेस यंत्रणाही पुढील वर्षी एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत बनावट आणि निकृष्ट औषधांची अनेक प्रकरणे बाजारात समोर आली आहेत.
बनावट आणि निकृष्ट दर्ज्याच्या औषधांचा वापर रोखण्यासाठी आणि औषधांची सत्यता पडताळण्यासाठी ‘ट्रॅक अँड ट्रेस’ ही यंत्रणा सुरु करण्याची सरकारची योजना केली आहे. या अंतर्गत, पहिल्या टप्प्यात फार्मास्युटिकल कंपन्या सर्वाधिक विकल्या जाणार्या 300 औषधांच्या प्राथमिक उत्पादन पॅकेजिंग लेबलवर बारकोड किंवा QR (क्विक रिस्पॉन्स-QR) कोड लावतील. प्राधमिक उत्पादनांमध्ये बाटल्या, कॅन, जार यांमध्ये विक्री केल्या जाणाऱ्या औषधांचा समावेश होणार आहे.
Discussion about this post