व्हीएसआरएस मराठी न्युज -राज्यात सत्तांतर होताच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्याची सुरुवात मंगळवारी झाली. सनदी अधिकारी श्रीकर परदेशी यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
परदेशी हे एप्रिल २०१५ पासून पंतप्रधान कार्यालयात संचालक म्हणून कार्यरत होते. गतवर्षी ते एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी विदेशात गेले होते. तिथून परतल्यानंतर आता त्यांची नियुक्ती उपमुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून करण्यात आली आहे.
आपल्या कार्यालयाचा कारभार अधिक गतिमान करण्यासाठी आणि विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंतप्रधान मोदी यांनी विविध राज्यांमधील आयएएस अधिकाऱ्यांचा एक कोअर गट स्थापन केला होता. त्यात परदेशी यांचा समावेश होता.
Discussion about this post