व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे.
मागील चोवीस तासात १४९मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढला असून धरणात एकूण ४२.१८टक्के पाणीसाठा आहे.
गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत झालेला एकूण पाऊस ६२५ मि.मी.
पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. महापालिका सध्या धरणातून 510 एमएलडी पाणी उचलते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.
Discussion about this post