व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -पाच दशके आपल्या संगीत आणि आवाजाने बॉलिवूडवर छाप सोडणारे ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी (वय 70) यांचे निधन झाले. मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटमध्ये बप्पी लाहिरी यांनी अखेरचा श्वास घेतला. तम्मा तम्मा लोगे, डिस्को डान्सर, याद आ रहा है तेरा प्यार ही सुपर हिट गाणी बप्पी लाहरी यांनी गायली आहेत. त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. तरुणाईला डिस्को डान्सवर थिरकायला लावणारे बप्पी लाहिरी हे आपल्या वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध होते. आपल्या हटक्या शैलीनं त्यांनी बॉलीवूड आणि संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 1973 साली त्यांनी नन्हा शिकारी या चित्रपटापासून बॉलिवुडमधील करीअरला सुरुवात केली.
1973 मध्ये ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटातून संगीतकार म्हणून पदापर्ण केलेल्या बप्पी लाहिरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या हटक्या संगीताने छाप सोडली. ऐंशी-नव्वदीच्या दशकात त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना तरुणाईला वेड लावले होते. त्यांच्या संगीतातील ही जादू कायम होती. ‘डर्टी पिक्चर’ या चित्रपटात त्यांनी संगीतबद्ध आणि पार्श्वगायन केलेल्या ‘उ लाला’ हे गाणंही चांगलंच लोकप्रिय ठरलं. 2021 मध्ये बप्पी लहिरी यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतू त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली.
OSA या आजारामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. गेली 29 दिवस बप्पी लाहिरी हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. सोमवारी त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. पण घरी आल्यानंतर त्यांनी प्रकृती पुन्हा बिघडली. त्यामुळे त्यांना पुन्हा रूग्णालयात दाखल करावं लागलं.
आलोकेश लाहिरी असे बप्पी यांचे मूळ नाव होते. बाप्पी यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
Discussion about this post