पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | जागतिक महिला दिनानिमित्त भारतमाता महिला मंडळ,प्रयास संस्था व एकबोटे हॉस्पिटल यांच्या विशेष सहकार्याने महिलांसाठी मोफत Breast Cancer Screening, Cervical Cancer Screening व तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शंभरहून अधिक महिलांनी सहभाग घेतला.
यावेळी बोलताना पुणे मनपा नगरसेविका प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे म्हणाल्या की,महिला कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना वैयक्तिक आरोग्याच्या तक्रारीकडे लक्ष देत नाहीत.त्यांनी स्वतःच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यावी.असे मत व्यक्त केले.
शिबिरासाठी महिलांनचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि अजून मोठ्या प्रमाणावर असे शिबिरे घेण्यात यावे अशी मागणी उपस्थित महिलांनी केली.शिबिरासाठी पुणे महानगरपालिका नगरसेविका प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे,भारतीय जनता पार्टी युवती आघाडी अध्यक्षा प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे,भारतीय जनता पार्टी युवती आघाडीच्या सरचिटणीस प्रियांका शेंडगे- शिंदे उपस्थित होते.आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले.
Discussion about this post