नवी दिल्ली : कुवेत राज्याचे अमिर शेख नवाफ अल-अहमद अल-जाबेर अल सबाह यांचे दिनांक १६ डिसेंबर रोजी निधन झाले असल्याने भारत सरकारच्यावतीने आज १७ डिसेंबर रोजी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे.
सहसचिव, भारत सरकार यांनी बिनतारी संदेशाद्वारे ज्या ठिकाणी नियमित राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या ठिकाणी दिनांक १७ डिसेंबर २०२३ रोज़ी अर्ध्यावर फडकविण्यात यावा. या कालावधित कोणत्याही प्रकारचे शासकीय करमणुकीचे कार्यक्रम करण्यात येऊ नयेत, असे प्रशासनाला कळविले आहे.
Discussion about this post