व्हीएसआरएस मराठी न्युज –मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष म्हणून कमलनाथ यांच्या जागी ओबीसी नेते जितू पटवारी यांची शनिवारी नियुक्ती केली आहे.
विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवाराकडून जितू पटवारी ३५ हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले होते. पुढच्या वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकीत राज्यात नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न काँग्रेस करीत असल्याचे जितू पटवारी यांच्या नियुक्तीकडे पाहून म्हटले जात आहे. काँग्रेसचा छत्तीसगडमध्येही पराभव झाला असला, तरी या राज्यातील प्रदेशाध्यक्षपदी दीपक बैज कायम आहेत.
मध्यप्रदेशमध्ये पक्षाने उमंग सिंघार यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्त केली आहे. म्हणजेच ते विधानसभेतील विरोधी पक्षनेते असतील. काँग्रेसने हेमंत कटारे यांची उपनेतेपदी निवड केली आहे. या निवडी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. कारण, पिढ्यान पिढ्या बदलांवर परिणाम करण्याव्यतिरिक्त ते जातीय समतोल साधण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना देखील प्रतिबिंबित करतात. कमलनाथ हे ब्राह्मण नेते होते आणि आता त्यांची जागा जितू पटवारी या ओबीसी नेत्याने घेतली आहे. उत्तम सिंघार हे आदिवासी आहेत आणि दिवंगत जमुनादेवी यांचे पुतणे आहेत, ते माजी उपमुख्यमंत्री होते आणि त्यांनी लोकसभा व राज्यसभेत राज्याचे प्रतिनिधित्व केले होते.
Discussion about this post