व्हीएसआरएस न्युज पुणे-राज्यात पुढच्या 4 ते 5 दिवसांत काही ठिकाणी गडगडाटासहीत जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात हवामान खात्याकडून येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय.
पुणे जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन तासांपासून जोरदार अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पुणेकरांनी घराबाहेर पडू नका, अशा सूचनाही हवामान विभागाकडून देण्यात आल्यात.
मी स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. आपण लवकरात लवकर घरी पोहोचा आणि घरी असाल तर बाहेर पडणे टाळा, असं आवाहन महापौर मोहोळ यांनी केलं आहे.
पुणे शहरातील पडणाऱ्या पावसाचा प्रचंड वेग लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. सर्व यंत्रणा सज्ज आहेत.
हवामान विभागाकडून यलो अॅलर्ट
4 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदगनर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
5 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदगनर, नाशिक, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली 4 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदगनर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर,
6 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे
7 ऑक्टोबर : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग.
पुणे आणि लगतच्या भागांवर सध्या १२ ते १५ किमी उंचीचे ढग आहेत. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन वाहतूक खोळंबणे, सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरणे, फ्लॅश फ्लडसारख्या घटना होऊ शकतात. पाऊस थांबेपर्यंत घरातच थांबा असे आमदार महेश लांडगे यांनी जनताला सूचना दिलेल्या आहेत.
#SatarkAlert
Discussion about this post