व्हीएसआरएस न्युज पिंपरी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यानाचे काम जलदगतीने पूर्ण करावे, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, संभाजी नगरमधील सुमारे ७ एकर क्षेत्रावर हे सर्पोद्यान आहे. सर्पोद्यानाचे प्राणीसंग्रहालयात रुपांतरीत करुन सुशोभीकरण केल्याने पर्यटन वाढीस लागेल, या उद्देशाने त्यांच्या कायापालट करुन नूतनीकरण करण्यात येत आहे. सर्पोद्यानाला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची मान्यता मिळाली आहे. प्राधिकरणाच्या नियम व अटीनुसार प्राणिसंग्रहालय उभारले जात आहे. सर्पोद्यानात विविध जातीचे एकूण ५५ सर्प, २ मगरी तसेच पक्षी व इतर प्राणी धरुन १८५ प्राणी व पक्षी सध्या आहेत. संत गतीने काम सुरू असल्यामुळे सर्वत्र झाडीझुडपी उगवली आहेत. तसेच, बांधकामांचा राडारोडा व साहित्य सर्वत्र विखुरलेले आहे.
पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण होत आली आहेत. मात्र, दुसऱ्या टप्यातील कामांना गती देणे अपेक्षीत आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
Discussion about this post