व्हीएसआरएस मराठी न्युज –
महापालिका आणि देहुरोड सीमेवर वृक्षारोपण करण्यात येत असलेल्या 50 हजार झाडांमुळे भविष्यातील वाढत्या तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर या हरित पट्ट्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला चांगला उपयोग होईल, असे मत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
महापालिका आणि वनप्रकल्प विभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी-देहुरोड सीमेवर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते वृक्षाचे रोप लावून वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमास वन प्रकल्प विभागाच्या पुणे विभागीय व्यवस्थापक सारिका जगताप, उप आयुक्त रविकिरण घोडके, देहुरोड छावणी परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार माने, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक उद्यान अधिक्षक राजेश वसावे, माजी नगरसेवक सचिन चिखले तसेच ज्ञानदीप माध्यमिक व सौ. अनुसया वाढोकार उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी, प्राचार्य सुबोध गलांडे, रमेश तिरखुंडे, बाळासाहेब पवार तसेच तरटे, सुहास चौधरी, ऋचा लाखे, रुपीनगर क्रिकेट क्लबचे प्रवीण बोडके, महेश भालेकर सुधीर पवार, राम धोत्रे, गो ग्रीन वृक्ष संवर्धन संस्थेचे प्रशांत भालेकर, सुधीरर पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते धनजंय शेडबाळे, बापूराव सोनवणे, सुनिल बहिरट, अशोक वायकर, भोकरे आदी उपस्थित होते.
Discussion about this post