व्हीएसआरएस न्युज पिंपरी-पिंपरी-चिंचवड आम आदमी पार्टीच्या वतीने पिंपरी येथील
सावली निवारा केंद्र येथे गोळ्या औषधे वाटप करण्यात आले.
सावली निवारा केंद्राचे प्रबंधक श्री गौतम थोरात यांनी तिथल्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली.पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारा संचालित ह्या केंद्रात राहणाऱ्या लोकांचे कौशल्य पाहून त्यांचा अभिमान वाटला
आप पिंपरी चिंचवड महिला विंग अध्यक्षा स्मिता पवार म्हटल्या आम आदमी पार्टीच्या वतीने नेहमीच अन्नदान वाटप पोलिसांना चहा नाश्ता वाटप असे वेगवेगळे उपक्रम घेण्यात येतात,
या वेळी सावली निवारा केंद्राचे कर्मचारी मिलिंद माळी व सचिन बोधनकर उपस्थित होते , त्यांनी निवारा केंद्रा बद्दल माहिती दिली व निवारा केंद्रातील रुग्णांना गोळ्या औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार देऊ असे त्यांनी सांगितले.
यावेळी आम आदमी पार्टीचे किशोर जगताप , वाहब शेख, वैजनाथ शिरसाट, नंदू नारंग, मुकेश रंजन, स्वप्नील जवळे,
आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
Discussion about this post