व्हीएसआरएस न्युज सोलापूर मड्डी वस्ती परिसरात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सायंकाळी ८ वाजता समाजकंटकांकडून दगडफेक झाल्याचे कळते. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याचे समजते.
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापूरमध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या गाडीचं नुकसान झालं असून त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना इजा झाली नसल्याची माहिती स्वत: गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. मात्र, हे सांगताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
“मड्डेवस्तीत बैठक झाल्यानंतर गाडीत बसलो आणि काही अंतरावर गेल्यावर गाडीवर दगड फेकण्यात आले. त्यानंतर ते सगळे पळून गेले. राज्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की पवारांच्या नेतृत्वाखाली कशी गुंडगिरी चालते. कुणालातरी पुढे केलं असेल”, असं पडळकर म्हणाले आहेत.
Discussion about this post